दापोली : रामराजे महाविद्यालयातील ‘श्रावणधारा’ काव्य संमेलनामुळे अनोखे चैतन्य

दापोली : रामराजे महाविदयालयातीक 'श्रावणधारा' काव्य संमेलनामुळे अनोखे चैतन्य

banner 468x60

रामराजे महाविदयालय, दापोली आणि जागरण संस्था यांनी संयुक्त सहकार्यांने महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच सादर केलेल्या श्रावणधारा या काव्यसंमेलनात एकापेक्षा एक सरस कवितांनी कॉलेज विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.

banner 728x90

कवी चेतन राणे यांच्या दर्जेदार प्रेम कवितेने विद्यार्थ्यांची उत्तम दाद मिळवली. प्रस्थापित व्यवस्थेवरती भेदक प्रकाश टाकणारी ‘सडा’ ही सुनील कदम यांची कविता श्रोत्यांना अस्वस्थ करून गेली.प्रा. जीवन गुहागरकर यांच्या काव्यगायनाने प्रेक्षकांची मने जिंकली. मंगेश मोरे बाबू घाडीगावकर, जयवंत चव्हाण, सोनम मोहिते, प्रा. देवानंद भुवड,सचिन चव्हाण यांच्या काव्यरचनाही लक्षवेधी ठरल्या.

सुदेश मालवणकर यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन दिलखुलासपणे व नेटके मार्मिक काव्य करीत केले. रामराजेच्या विद्यार्थ्यांमध्ये पायल शिंदे, सुहानी भुवड,नीता जाधव, मयूर जाधव,सानिया मोहिते, वैष्णवी काशटे,अपूर्वा गुडेकर,सनी मोहिते यांनी उत्साहाने काव्यवाचनात सहभाग दर्शविला कवी ‘केशवकुमार’ अर्थात आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे औचित्य साधून

प्रा. माधव गवाणकर यांनी अत्रे यांच्या वाड्मयीन कामगिरीवर भाष्य केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे, प्रा. कुणाल मंडलिक, पत्रकार अजित सुर्वे, जितेंद्र गावडे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *