दापोली : रत्नागिरी भूषण पुरस्कारानंतर रामराजे कॉलेजकडून तेजस बोरघरे यांचा सत्कार

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या, तसेच ग्रामीण कोकणातील ज्वलंत प्रश्नांना निर्भीडपणे व निःपक्षपाती पत्रकार म्हणून ओळखले जाणारे कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला.

हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दापोली येथील रामराजे महाविद्यालयाच्या वतीने तेजस बोरघरे यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. विशेष बाब म्हणजे तेजस बोरघरे हे रामराजे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी याच महाविद्यालयातून मास मीडियाचे शिक्षण पूर्ण केले आहे.

banner 728x90


आपल्या माजी विद्यार्थ्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय सन्मान प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालय प्रशासन, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

आपल्या मनोगतात तेजस बोरघरे यांनी रामराजे महाविद्यालयातील शिक्षण, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयीन संस्कार यामुळेच पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील प्रश्न, सामान्य नागरिकांचे हक्क आणि सामाजिक अन्यायाविरोधात आवाज उठवणे हीच पत्रकारितेची खरी भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

Screenshot

मान्यवर वक्त्यांनी तेजस बोरघरे यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव करताना समाजहितासाठी निर्भीड आणि जबाबदार पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. अशा पुरस्कारांमुळे युवा पिढीला सकारात्मक दिशा मिळते, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बालाजी सगरे (वैद्यकीय अधीक्षक, कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, खेड), रेखा बागुल (आनंद फाउंडेशन, दापोली), संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण उपस्थित होते.

तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य मृदुला निमकर, रेखा जगरकर, रुचिता नलावडे, दिनेश जैन, रामराजे महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा. कुणाल मंडलिक, प्रा. वेदिका राणे, प्रा. जालिंदर पाटील, प्रा. निलेश तेरेदाई, तसेच नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सुवर्णा जंगम यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली कोंडविलकर व पूजा काळे यांनी केले.
यावेळी कोकण कट्टा न्यूजचे प्रतिनिधी सलीम रखांगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *