दापोली : नॅशनल हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताहाची सांगता

दापोली : नॅशनल हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताहाची सांगता

banner 468x60

दापोली नॅशनल हायस्कूल दापोलीमध्ये विविध उपक्रमाद्वारे शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झालाय .या सप्ताहास केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांनी या सप्ताहामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. शासनाने दिलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन शिक्षणाप्रती गोडी निर्माण करण्याचे कार्य प्रशालेतील शिक्षकांनी केल्याचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला यांनी सांगितले.

सप्ताह यशस्वी करण्यासाठी जेष्ठ शिक्षक रियाज म्हैशाले, जेष्ठ शिक्षिका फैरोजा सावंत व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

या सप्ताहास संस्थेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, गव्हर्नर बॉडी चेअरमन लियाकत रेखांगे व सचिव इकबाल परकार यांनी भेट देत शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *