चिपळूण :युवतीच्या श्वसन नलिकेत अडकली मोबाईल सिम कार्डची पिन, डेरवणमधील वालावलकर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

banner 468x60

चिपळूण डेरवणमधील वालावलकर रुग्णालयात एक आगळीवेगळी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

banner 728x90

मोबाईलचा सिम कार्ड काढण्याच्या नादात तोंडात ठेवलेली पिन श्वसननलिकेतून फुफ्फुसाच्या एका कोपऱ्यात अडकलेल्या महिलेवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ती पिन बाहेर काढण्यात यश आलं आहे.

रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने मोबाईलचं सिम बदलताना सिम कार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवली होती. चुकून ती पिन गिळल्यामुळे,

त्या महिलेला श्वास घेण्यास किंवा गिळताना काही त्रास होत नसल्याने, ती डॉक्टरांकडे न जाता रात्री घरीच राहिली. ही घटना २० ऑगस्ट रोजी घडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथे सर्जन डॉ. रविंद्र गोंधळेकर यांना दाखवले. त्यांनी अन्ननलिकेची स्कोपी केली, परंतु त्यांना ती पिन दिसली नाही.

त्यानंतर त्यांनी छातीचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन केला, ज्यामध्ये उजव्या बाजूच्या श्वसननलिकेत पिन अडकलेली आढळली.

डॉ. गोंधळेकर यांनी लगेच त्या महिलेला वालावलकर रुग्णालयात जाण्यास सांगितले. वालावलकर हॉस्पिटलमधे येताच पेशंटला रुग्णालयाचे ई. एन. टी सर्जन डॉ. राजीव केणी यांनी तातडीने सेवा विभागात तपासले आणि नातेवाइकांना इमर्जन्सी ऑपरेशन करून पिन श्वसनलिकेतून काढण्याचा सल्ला दिला.

नातेवाईकांनी क्षणाचा विलंब न करता वालावलकर हॉस्पीटलच्या तज्ञांवर विश्वास ठेवून ऑपरेशनची तयारी दाखवली. डॉ. राजीव केणी यांनी ऑपरेशनला लागणाऱ्या पूर्वतपासण्या आणि ऑपरेशनची तयारी लगेच करून घेतली.

रात्री सुमारे १० वाजता पेशंटला ऑपरेशनला घेण्यात आले आणि डॉ.राजीव केणी यांनी अत्यंत कुशलतेने ब्रोन्कोस्कोपी करून उजव्या फुफुसाच्या श्वासनलिकेतील पिन बाहेर काढली. अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया सहजरित्या झाल्यामुळे पेशंटच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ब्रोन्कोस्कोपी ही शस्त्रक्रिया अवघड असते यामध्ये पेशंटच्या जीवाला धोका असतो. तसेच भूल देणे खूप कठीण असते. या शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याचे अत्यंत अवघड असे काम डॉ. लीना ठाकूर, डॉ. गौरव बाविस्कर आणि त्यांच्या टीमने अत्यंत चोखपणे पार पडले. रुग्णांचा वालावलकर हॉस्पीटलच्या डॉ. राजीव, डॉ. प्रतीक आणि डॉ. सीजा या कान, नाक, घसा तज्ञांवर वाढलेला विश्वास हीच त्यांच्या यशस्वीतेची पोचपावती आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *