चिपळूणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकीकडे राज्यात महिलांच्या आत्याचाराच्या घटना वाढ होत असताना चिपळूणमध्ये देखील संताप आणणारी घटना घडली आहे.
पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन झाल्याचा प्रकार बुधवारी अलोरे परिसरातील एका शाळेत घडला आहे. याप्रकरणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी या शाळेत महात्मा गांधी याच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबधित शिक्षकेतर कर्मचाऱ्याने या विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले. त्यामुळे शाळा सुटल्यावर मुलीने घडला प्रकार तिच्या पालकांना सांगितला.
यामुळे पालकांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे गाठत घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी संबधितावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
याची माहिती पंचक्रोशीत पसरताच शाळेतील अन्य मुलांच्या पालकांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*