खेड : अल्पवयीन मुलीचे फोटो मॉर्फ करून, शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला अटक

banner 468x60

खेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे फोटो मॉर्फ करून धमकी देत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या जगदीश मारूती गोटल (२८ रा. गुणदे-गोटलवाडी) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.

banner 728x90

न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जानेवारी ते १३ ऑगस्ट या कालावधीत ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

पीडित अल्पवयीन युवतीचा बनावट इन्स्ट्राग्राम आयडी तयार करून तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो अपलोड करत तिच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर अनोळखी व्हॉटस्ॲप क्रमांकावरून पाठवले. यानंतर धमकीसह अश्लील मॅसेज पाठवत शरीरसुखाची मागणी केल्याचे पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करत सीमकार्ड धारकाचा शोध घेतला असता त्याने अन्य व्यक्तीस वापरण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेत चौकशी केली असता ३१ जुलै रोजी लोटे एमआयडीसीतील आरएसडी कंपनीमध्ये कामाला असताना सिक्युरिटीकडे मोबाईल दिला होता.

याचवेळी सिक्युरिटीच्या ताब्यातून कोणीतरी मोबाईल नेला होता. या दरम्यान कंपनीत इन- आउट रजिस्टर पडताळणी केली असता जगदीश गोटल नावाचा व्यक्ती काम संपवून घरी गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याचा शोध घेत पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असताना हालचाली संशयास्पद वाटल्याने ताब्यात घेतले.

संशयिताने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर अटक करण्यात आली. त्याच्याकडून १० हजार रूपये किंमतीचे २ मोबाईलही जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजन सस्ते यांच्या मार्गदर्शनाखालील पथकात पोलीस निरीक्षक नितीन भोयर, पोलीस कॉन्स्टेबल रूपेश जोगी, वैभव ओहोळ, कृष्णा बांगर, हेडकॉन्स्टेबल रमिज शेख, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश शेलार, दुर्वा शेटे यांचा समावेश होता .

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *