दाभोळ : मुलीची छेड काढणाऱ्या एसटी बसच्या कंडक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Screenshot

banner 468x60

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असताना दाभोळजवळील असलेल्या पंचनदी कोळथरे दरम्यान मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला आहे.

दाभोळवरून कोलथरेकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. दाभोळ कोळथरे दरम्यान शाळेत जाणाऱ्या अनेक मुली या गाडीमध्ये असतात. आज देखील शाळेत जाणाऱ्या मुली या एसटी बसमध्ये होत्या.

दरम्यान एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या पायाला वाईट हेतूने स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या एस.टी. बसच्या वाहकाविरोधात दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत दाभोळ सागरी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी कोलथरे जाणाऱ्या एस. टी. बसमधून प्रवास करत असताना या बसचे वाहक माजीद मेहबूब तांबोळी (वय ४०) यांनी आघारी फाटा येथे बस आली असताना तू इथे उतरू नको, आपण फिरून येवू असं सांगत या मुलीला वाईट हेतूने स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन वाहक तांबोळी यांनी केले.

याच वाहकाने असेच वर्तन या मुलीशी यापूर्वीही केल्याची माहिती तिने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच अनेक ग्रामस्थांनी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात धाव घेतली व या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी पोलिसांकडे केली.

काही वेळ मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र दाभोळ पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या मुलीच्या तक्रारीवरून वाहक माजीद मेहबूब तांबोळी याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत.

घडलेला प्रकार गावकऱ्यांना समजताच गावातील गावकरी एकत्र जमत याबाबत जाब विचारला आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

मात्र धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे हा एसटी कंडक्टरकडे वाहक असलेला कोणताही ओळखपत्र नव्हतं एसटी आगारातून प्रत्येक वाहक आणि चालकाला बॅच दिलं जात मात्र या कंडक्टरकडे अशी कोणतीही ओळख दाखवणारा पुरावा नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.

मात्र टवाळखोरांबाबत महिलांना त्रास असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन दाभोळ पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी केलंय.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *