मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे गोवळवाडी येथे मुंबईच्या दिशेने जात असलेल्या खासगी बस क्र. एमएच ०६- एस-९७३१ ने त्याच दिशेने चाललेल्या स्कुटी प्लेझर क्र. एमएच ०८-एके-२९३३ या गाडीला धडक दिली असता
या स्कूटीने दुसरी स्कूटी क्र. एमएच ०८- एएस-९२४१ ला धडक दिली. या तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन किरकोळ जखमी झाले.
खेड भरणेनाका ब्रिजखाली उभी असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले.
रविंद्र सुरेश सुतार, रा. कळंबणी, सांची रविंद्र सुतार, वय-७, रा. कळंबणी, राहुल संतोष सुतार रा. कळंबणी हे जखमी झाले आहेत. या अपघातात स्कूटी चालक मुबीन नाडकर रा. संगलट, खेड याचा मृत्यू झाला.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*