गुहागर : बोलेरो पिकअपच्या अपघातात एकाचा मृत्यू

banner 468x60

गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकअपचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुनील संतराम वर्मा (रा. चिरनपूर, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव असून, या अपघातात चालक मेहेरतेज दिवाकर गुडेला याच्यासह अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

banner 728x90 banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास आबलोली-तवसाळ मार्गावरून महिंद्रा बोलेरो पिकअप डिझेल टँकर (क्रमांक आर.जे ४७ जी.ए ८३८६) वेगाने जात होती. अशोका बिल्डकॉन कंपनीपासून १०० मीटर अंतरावर पोहोचल्यानंतर चालक मेहेरतेज गुडेला याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीचे स्टेरिंग अचानक डाव्या बाजूला फिरल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटून हा मोठा अपघात झाला.


या अपघातात सुनील वर्मा याचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला, तर फिर्यादी रवींद्र जयंतीलाल यादव, तलत अहमद नूर खान, उपेंद्र श्रीकृष्णानंद यादव आणि चालक मेहेरतेज गुडेला हे जखमी झाले आहेत. सर्व जखमी आणि मृत व्यक्ती सध्या तवसाळ येथील अशोका बिल्डकॉन कंपनीच्या कॅम्पमध्ये वास्तव्यास होते.याप्रकरणी गुहागर पोलिसांनी आरोपी चालक मेहेरतेज दिवाकर गुडेला याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन

अधिनियमातील कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे वाहन चालवून निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका चालकावर ठेवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *