शृंगारतळी : फिरोज शेख यांचा प्रामाणिकपणा हरवलेल्या दागिने व पैश्याचे पाकीट केले परत

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे काही दिवसांपूर्वी पालपेणे गावातील एक मुलीचे पाकीट हरवले होते खूप दिवस शोधून चौकशी करून सुद्धा ते मिळाले नाही,
काही दिवसांनी उमेश खैर यांना मित्र फिरोज शेख (दोस्ती मोबाईल शॉपीचे मालक) यांचा फोन आला ,साहजिकच पालपेणे गावची व्यक्ती म्हटल्यावर इतरांप्रमाणे त्याने उमेश खैर यांना फोन करून विचारले सदर व्यक्ती परिचयाची आहे का,उमेश यांच्या कडे चौकशी केली असता पाळपेने गावची मुलगी आहे तिचे पाकीट पडले आहे

असे समजले
आणि जिचे काही दिवसापूर्वी पॉकिट हरवले आहे जे प्रयत्न करूनही सापडले नव्हते ,ज्यात तिची महत्वाची कागदपत्रे,काही रक्कम आणि एक सोन्याची छोटी वस्तू होती.


दुसऱ्या दिवशी त्या मुलीला शृंगारतळीत पाठवून तिची ओळख पटवून फिरोज यांनी तिच्या वस्तू तिच्या ताब्यात दिल्या, स्वाभिमानी फिरोज जो आज शारीरिक विकलांग आहे,पण मनाने तितकाच भक्कम,जिद्दी आणि मेहनती ही आहे त्याच्या या प्रामाणिक भावनेने आज कित्येक जणांच्या डोळ्यात प्रामाणिक पणाचे झणझणीत अंजन घातले आहे. फिरोज शेख यांच्या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *