शृंगारतळी :महावितरणचे अभियंता मंदार शिंदे यांची मुंबई येथे बदली

banner 468x60

महावितरण कंपनीचे शृंगारतळी येथील अभियंता मंदार शिंदे यांची नुकतीच मुंबई येथे बदली झाली आहे. ग्रामपंचायत पाटपन्हाळे चे सरपंच विजय तेलगडे,

उपसरपंच असीम साल्हे व ग्रामस्थ यांनी शृंगारतळी शहरातील स्ट्रीट लाईट सुरु होण्यासंदर्भात पाठपुरवठा केला असता अभियंता शिंदे यांच्या तत्परतेने शृंगारतळी शहरातील स्ट्रीट लाईट गेल्या वर्षी गणपती सनापासून सुरु करण्यात आली.

पावसात सतत विद्युत पुरवठा खंडित होणे विजवाहिन्या तुटणे, ट्रान्सफॉर्मर खराब होणे, ग्राहकांच्या समस्या अश्या वेळी ते नेहमीच ग्रामपंचायतीला व वीज ग्राहकांना सहकार्य करीत असत.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शृंगारतळी बाजारपेठेत करण्यात आलेली विद्युत रोषणाई करिता शिंदेनी ग्रामपंचायतीला सहकार्य केले. अभियंता शिंदेची बदली झाल्याचे समजताच अभियंता मंदार शिंदेचा सत्कार करून निरोप देण्यात आला.

यावेळी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच असीम साल्हे, सदस्य रुपेश राऊत, पोलीस पाटील विशाल बेलवलकर उपस्थित होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *