काळ आला होता, मात्र वेळ आली नव्हती, याची प्रचिती दाभोळ फेरीबोट याठिकाणी आली आहे. दाभोळहून धोपावेला जाणाऱ्या फेरीबोटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
दाभोळवरून धोपावेला जाणाऱ्या पावणे चारच्या फेरीबोटमध्ये सरस्वती सकपाल वय ५५ फेरीबोटमधून उतरत असताना फेरीबोटचा लोखंडी फाळका महिलेच्या पायावर गेल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की दाभोळवरून पावणे चार वाजता सुटलेली फेरीबोट धोपावेला गेली असता धोपावे येथे येताच अनेकजण उतरण्याची घाई करतात मात्र हीच घाई या
महिलेच्या जीवावर बेतली असती एसटी पकडण्यासाठी या महिलेने घाई करुन धोपावे जेटीला फाळका लागण्यापूर्वीचफेरीबोटीतून उडी मारली मात्र मागून येणाऱ्या फाळक्यात या महिलेचा पाय अडकला आरडाओरड करताच मोटरमननं फेरीबोट मागं घेऊन थांबवली.
त्यानंतर फेरीबोटवर असणाऱ्या नागरिकांच्या मदतीनं महिलेला बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेत महिलेचा जीव वाचला आहे, मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे धोपावे फेरीबोटवर मोठा गोंधळ उडाला. सदर महिलेला दाभोळमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सावर्डे डेरवनला हलवण्यात आली आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*