दापोली तालुक्यातील सुरेवाडी, मौजे ताडील (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथील भारतीय जनता पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी ग्रामस्थांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश करण्यात आला.

दापोली येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवप्रवेशित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार नवप्रवेशितांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे दापोली तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे सांगण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











