संगमेश्वर कडवई येथील किंजळकर–धुळप वाडीमध्ये वार्षिक होळीच्या सार्वजनिक पूजेच्या निमित्ताने फॉरेन रिटर्न शिवभक्त कोकण नमन मंडळाचा विशेष सत्कार उत्साहात पार पडला. परदेशात कोकणची लोकसंस्कृती आणि नमन परंपरा जपणाऱ्या या मंडळाच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त करत कलाकारांचा सन्मान केला.
कार्यक्रमास वाडीप्रमुख संजयजी किंजळकर आणि सुभाष धुळप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पंचायत समिती सदस्या अपर्णा जाधव तसेच अरविंद जाधव यांनी उपस्थित राहून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. लोककलेच्या जतनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे समालोचन प्रा. किंजळकर यांनी केले. त्यांनी नमन परंपरेचा वारसा आणि परदेशातील सादरीकरणाची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन
केले.शिवभक्तचे निर्माते युयुत्सु आर्ते, सहनिर्माते परेश देवरुखकर, दिग्दर्शक निलेश किंजळकर तसेच कलाकार केतन किंजळकर, वैभव पडये, मदन पांडव, अनिल किंजळकर, प्रणित काकवल, प्रमोद करंडे आदी मंडळी यावेळी उपस्थित होती. सत्कारार्थ शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामस्थांनी व्यक्त केलेला सन्मान व जिव्हाळा कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरला असून पुढील सांस्कृतिक वाटचालीस नवी ऊर्जा मिळाल्याची भावना मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













