पालघर : स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने भावरपाडा, विराथन सफाळे, पालघर येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला, ज्यात चित्रकला स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वाटप आणि अल्पाहार वाटपाचा समावेश होता.

कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते महेश थरवळ, मानवी महेश थरवळ आणि सुनंदा चॅरिटेबल ॲन्ड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश गुडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि अल्पाहार वाटप करण्यात आले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक अन्वी संदेश ठोंबरे, द्वितीय क्रमांक आरोही संजय बावधने, तर तृतीय क्रमांक दक्ष कल्पेश गोताड यांनी पटकावला. तसेच रिद्धी राजेश कांबळे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे खजिनदार स्वप्नील गोसावी, सचिव. प्रीती गुरव, सदस्य अविनाश साटले, रोहित बेंडल,. अभिजीत गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष. मयुर गोसावी यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांचे आभार मानले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*