चिपळूण : शिरगावमध्ये दीपावलीनिमित्त ‘सप्तसुरांची मैफिल’; प्रसिद्ध कलादिग्दर्शक देवदास भंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रंगणार सुरांचा उत्सव

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील शिरगाव गावात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक सुरेल सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. वाशिष्ठी फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘सप्तसुरांची मैफिल’ हा संगीतमय कार्यक्रम पार पडणार आहे. शिरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या समोरील मैदानावर हा कार्यक्रम होईल.

banner 728x90

या कार्यक्रमाला प्रख्यात चित्रकार आणि सिने कलादिग्दर्शक देवदास काशीनाथ भंडारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, या संगीतमय संध्याकाळी तृप्ती जाधव, अनिकेत चव्हाण आणि मंगेश तांबे हे लोकप्रिय गायक आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांची मनं जिंकणार आहेत. कार्यक्रमात विविध सुरांनी सजलेली गाणी सादर केली जाणार असून, गायकांना उत्कृष्ट संगीतसाथही लाभणार आहे.

🎤 सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती:

या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये:

आमदार शेखर निकम

माजी आमदार भास्कर जाधव

भाजपा नेते प्रशांत यादव

चिपळूण नागरी पतसंस्थेच्या चेअरमन स्वप्ना यादव

माजी आमदार सदानंद चव्हाण

माजी पंचायत समिती सदस्य बाबू साळवी

अबू ठसाळे

खेर्डी माजी सरपंच दशरथ दाभोळकर

माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे

माजी तालुकाप्रमुख सुधीर शिंदे

राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष जागृतीताई शिंदे

शिरगाव तंटामुक्त अध्यक्ष राजन शिंदे

शिरगाव सरपंच नीता शिंदे

उपसरपंच नागेश सोलकर

माजी सरपंच अनिल शिंदे

शिरगाव सोसायटी चेअरमन जयंत शिंदे, माजी चेअरमन भाई शिंदे, संचालक श्रीराम पवार

कुंभार्ली उपसरपंच संदीप कोलगे

व्यापारी मंडळ अध्यक्ष भरत लब्ध्ये

शिवराज उर्फ बाबू कापडी, माजी सदस्य संदीप भोसले

मूर्तिकार संदीप ताम्हणकर, राजू माचकर आदींचा समावेश आहे.

📣 सर्व शिरगावकर नागरिकांना निमंत्रण:

या संगीतमय दीपोत्सवात सहभागी होऊन सुरांच्या दैवी अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश लब्ध्ये, सतीश शिंदे, निसार शेख आणि अशोक लांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *