संगमेश्वर : पत्नीशी वादातून संताप, मुलावर बापानेच केले चाकूने वार; बापाविरोधात गुन्हा

banner 468x60

रत्नागिरी – पत्नीशी झालेल्या वादामुळे संतप्त झालेल्या एका बापाने आपल्या आठ वर्षांच्या मुलावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात महेश उदय यादव (वय ३६, रा. निवे बुद्रुक, सरोदेवाडी – संगमेश्वर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.


banner 728x90 banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री कुवारबाव रेल्वे स्टेशन फाटा येथे घडली. महेश यादव आपल्या मुलगा तेज (वय ८ वर्षे) याला शांतिनगर येथून आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८, एक्यू ३३४६) मधून मारुती मंदिर येथील खाऊगल्ली येथे घेऊन गेला होता.


तेथून पुन्हा घरी जात असताना रिक्षामध्येच त्याला खेडशी येथे भाडे मिळाले. भाडे सोडून परत येत असताना महेश यादवच्या पत्नीने त्याला फोन केला. या फोनवर दोघांमध्ये वाद झाला.

वादाच्या संतापामुळे महेश यादव रिक्षामध्येच मुलाच्या हातावर चाकूने वार करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.

मुलाची प्रकृती आणि वैद्यकीय अहवालाबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध नाही. पोलिस घटनेच्या सर्व पैलूंचा तपास करत आहेत आणि आवश्यक असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये देखील गंभीर चिंता निर्माण झाली असून, बालहक्क आणि कुटुंबातील हिंसाचार यावरील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *