संगमेश्वर : शिक्षक झाला भक्षक, शाळकरी मुलींशी शिक्षकाचे अश्लील चाळे

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील वांद्री शाळेतील शिक्षकच भक्षक झाला आहे. वांद्री शाळेत शाळकरी मुलींशी शिक्षकाचे अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला ग्रामस्थांनी जाब विचारत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

ही घटना आज शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. वांद्री येथील प्राथमिक शाळेत पाचवी,सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत शिक्षक हा अश्लील चाळे करायचा.

पाचवी, सहावीतील मुलींशी तो अश्लील कृत्य करत होता. शेवटी कंटाळून या मुलींनी घरी सारा प्रकार सांगितला. यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी तातडीची पालक सभा लावली असून संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकाला जाब विचारण्यास सुरूवात केली.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी गावात समजताच अन्य ग्रामस्थांनी सायंकाळी शाळेवर धडक दिली. शिक्षकाला जाब विचारला आणि वातावरण चिघळताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

प्रकरण गंभीर असल्याने डिवायएसपीसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत करत शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

संगमेश्वर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी संगमेश्वर पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. दरम्यान या भक्षक शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *