व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी विविध स्पर्धेत उल्लेखनीय यश प्राप्त केले असून क्रशा इंदानी हिने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तिसरा क्रमांक तर प्रज्ञा कांबळे हिने एन एम एम एस परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
क्रिशा कपिल इंदानी ही विद्यार्थिनी इयत्ता सातवी मध्ये शिकत असून तिने तालुका आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. तिची निवड राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी झाली होती. सदर स्पर्धा २० मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली .
या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून क्रिशा हिने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
इयत्ता आठवी मध्ये शिकणारी प्रज्ञा गणपत कांबळे या विद्यार्थिनीने एन एम एम एस या परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान मिळवला असून तिला दरवर्षी १२ हजार याप्रमाणे पुढील चार वर्षे ही शिष्यवृत्ती
प्राप्त होणार आहे. क्रिशा आणि प्रज्ञा या दोन्ही विद्यार्थिनींसह मार्गदर्शक शिक्षकांचे व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी अभिनंदन केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*