संगमेश्वर : जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या वाहनावर पोलिसांची धाड

banner 468x60

संगमेश्वर लोवले दरम्यान गुरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना बुधवारी संगमेश्वर पोलिसांनी थेट कारवाई केली. वाहनासह जनावरे नेणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

banner 728x90


पिकअप गाडीसह पाच गुरे संगमेश्वर पोलिसांनी पकडली असून ४ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या वेळी शंकर भागोजी वाघमोडे (वय- २७ वर्षे रा. चांदोली आंबा ता. मलकापुर जि. कोल्हापुर) पांडुरंग कोंडीबा लांबोरे (वय – ३२ बर्षे रा. कांडवड ता. मलकापुर जि. कोल्हापुर) यांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याबरोर पिकअप गाडी (एम.एच ०८ डब्ल्यु ३४९१ ) जप्त केली आहे.


या प्राण्यांना अत्यंत दाटीवाटीने वाहनात कोंबले होते. गुरे वाहतुक करण्याचा परवाना नराताना तसेच विना लायसन्स गाडी चालवुन भागोजी भिरु कोलापटे रा. लपाळा ता. शाहुवाडी जि. कोल्हापुर यांचे सांगणेवरुन सावर्डे ता. चिपळुण येथील मधुकर तुकाराम सावर्डेकर बय ६० वर्षे रा. कळवंडे ता. चिपळुण यांचेकडुन गुरे ही कत्तलीकरीता गैरकायदा बिगर परवाना अवैधपणे वाहतुक करून घेवुन जात असताना आढळून आले .

या सर्वांवर महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपधिक्षक शिवकुमार पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सचिन कामेरकर , उपनिरीक्षक प्रशांत शिंदे मनवळ, किशोर जोयशी, कोलगे यांनी ही कारवाई केली .अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *