संगमेश्वर : चालकाला डुलकी, एसटी बसचा अपघात

banner 468x60

संगमेश्वर येथे चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी झाले आहेत.

सर्व प्रवासी अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते. हा अपघात शनिवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे झाला.


याबाबत संगमेश्वर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातप्रकरणी चालक राजेंद्र उखा वाघ यांच्यावर संगमेश्वर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी कैलास अशाेक साबळे यांनी फिर्याद दिली आहे.

आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी कैलास अशाेक साबळे यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात सुधीर सदाशिव मसूरकर (४०), प्रमिला सुधीर मसूरकर (३२), वीर सुधीर मसूरकर (१०), कार्वी सुधीर मसुरकर (५), प्रिया प्रकाश राणे (५१), वैभव प्रकाश राणे (३०), प्रवीण शंकर सावंत (४९) आणि विद्या प्रवीण सावंत (४९, सर्व रा.कणकवली, सिंधुदुर्ग) हे जखमी झाले आहेत.

हे सर्वजण गणपतीसाठी गावाला येत हाेते. बसचालक राजेंद्र वाघ हे शनिवारी इगतपुरी येथून अंधेरी ते सावंतवाडी (एमएच १४, बीटी १७०८) ही गाडी घेऊन सिंधुदुर्गकडे जात हाेते.

मुंबई-गाेवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे बस आली असता चालक वाघ यांना डुलकी आली. त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन उलटली.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *