संगमेश्वर : 40 वर्षीय युवक बेपत्ता

banner 468x60

संगमेश्वर येथून 40 वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदय सिताराम जडयार, वय वर्षे ४०, रा. कासे घाणेकरवाडी, संगमेश्वर त्यांच्या रहात्या घरातून २००३ मध्ये बेंगलोरला कामाला जातो असे सांगुन निघुन गेले ते घरी आलेले नाही, नापत्ता झाले आहेत.

banner 728x90

त्यांची उंची ५ फुट ५ इंच, अंगाने मजबुत, चेहरा उभट, रंग सावळा, केस काळे, नेसणीस प्लेन फुल हाताचा शर्ट व जीन्स पॅन्ट आहे.

नितीन सत्यवान जंगम, वय वर्षे ३३ रा.धामापुर जंगमवाडी, संगमेश्वर हे ११ मे २०२२ रोजी सांयकाळी ७ वाजता धामापुर जंगमवाडी, संगमेश्वर येथून नापत्ता झाले आहेत.

त्यांची उंची ५ फुट, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, मधला दात पडलेला, रंग गोरा, केस काळे बारीक, नेसणीस चौकडचा फुल हाताचा शर्ट व निळी जीन्स पॅन्ट, पायात स्लीपर आहे.


वरील नापत्ता व्यक्तींबाबत आपल्याला माहिती मिळाल्यास आपण संगमेश्वर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *