भोंदूबाबाच्या नादी लागल्याने दोन्ही पदं गमावली; रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

banner 468x60

शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिक चा भोंदूबाबा अशोक खरातमुळे (Ashok Kharat) रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

banner 728x90 banner 728x90

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. तर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही चाकणकरांना राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आरोप होत असलेल्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती समोर आली. परंतु, चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


Rupali Chakankar Ashok Kharat Case : राजीनाम्याचा निर्णय राष्ट्रवादीचा
राष्ट्रवादीकडून शुक्रवारी सकाळीच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी सूचना रुपाली चाकणकरांना करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार रुपाली चाकणकर यांनी आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. भोंदूबाबामुळे रुपाली चाकणकरांवर दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यायची वेळ आल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *