दाभोळमध्ये ‘रात्रीस खेळ चाले’, विकृत व्यक्तीचे थक्क करणारे कारनामे

banner 468x60

राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना गावखेड्यात देखील याची धग पोहचली आहे. दाभोळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

दाभोळमधील चव्हाणवाडीत राहत असणाऱ्या रूपेश आडविलकर या विकृत व्यक्तीचे थक्क करणारे कारनामे समोर आले आहेत. दाभोळमधील एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

गेल्या 7 ते 8महिन्यापासून हा सर्व प्रकार घडत असल्याची माहिती महिलेने दिलीय. याबाबतची तक्रार दाभोळ पोलीस स्टेशनला दिली आहे. जेव्हापासून राहत आहे तेव्हापासून या प्रकारचा मानसिक त्रास झाल्याचं सांगितलं.

याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की सदर महिला ही चव्हाणवाडी शेजारी असलेल्या गुजरआळीत गेल्या काही महिन्यापासून राहत आहेत. मात्र मार्चपासून राहत असलेल्या रुमजवळ रात्री अपरात्री घराच्या छतावर दगड मारणे, खिडकी वाजवणे, दरवाजा वाजवण्याचे प्रकार घडत होते. एकटी महिला राहत असल्याने या सगळ्याची भीती आणि मानसिक त्रास झाल्याचं महिलेनी सांगितलं.

त्याचबरोबर त्यांच्या रूमच्या मागच्या साईडला असलेल्या बाथरुममध्ये स्त्रियांचे अंर्तवस्त्र, निरोधची पॅकेट टाकणे असे प्रकार एक दोन वेळा घडलेले आहेत. अनेकवेळा हे प्रकार घडत असल्याने महिलेला मानसिक त्रास झाला. या प्रकारामागे नेमकं कोण आहे हे शोधण्यासाठी त्यांनी रूमच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा लावला.

त्याच्या काही दिवसानंतर रूपेश आडविलकर हा व्यक्ती या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. दरम्यान सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा डाटा चेक करत असताना 23.33 वाजताचे सुमारास एक अनोळखी इसम बेडरूमच्या खिडकीला असलेल्या लोखंडी जाळीला हाताने काहीतरी करीत असल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसून आला.

हा व्यक्ती त्याठिकाणावरून मागील बाजूकडे निघून गेला. सीसीटिव्ही असलेला व्यक्ती ओळखीचा असून हा व्यक्ती चव्हाण वाडी दाभोळ येथे गेल्या पाच वर्षांपासून चव्हाण वाडीत राहत असल्याची माहिती आहे. याची खात्री करण्यासाठी दाभोळमधील गुजरआळीतील काही नागरिकांनी सदर व्यक्तीची ओळख सांगितली.

सदर प्रकार हा त्या इसमानेच केलेला असल्याची खात्री झाल्यानंतर दाभोळ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा व्यक्ती रूपेश आडविलकर, मुळ राहणार . कोळथरे कुंभारवाडी असून तो दाभोळमध्ये राहत होता.

दाभोळ पोलिसांनी तातडीने तक्रारीची दखल घेत सदर व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) 79 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *