रत्नागिरीच्या ओंकार कोळेकर यांचा ‘वंदे मातरम् लोगो’ राज्यात दुसरा

banner 468x60

‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेत रत्नागिरीच्या ओंकार अनंत कोळेकर यांनी खुल्या गटातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शालेय, महाविद्यालयीन व खुला अशा तीन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

banner 728x90

कला, संस्कृती व राष्ट्रभक्तीचा संगम दर्शवणाऱ्या संकल्पनांना या स्पर्धेत प्राधान्य देण्यात आले. स्पर्धेतील लोगोचे परीक्षण मुंबईतील सुप्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या प्राध्यापकांनी केले. निवड करण्यात आलेल्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला राज्यातील विविध मान्यवर, वरिष्ठ अधिकारी तसेच कला व डिझाईन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. ओंकार अनंत कोळेकर हे रत्नागिरीतील रहिवासी असून, त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी जिओ स्टुडिओमध्ये काही काळ सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करत प्रत्यक्ष माध्यम क्षेत्राचा अनुभव मिळवला.

सध्या ते मुंबई विद्यापीठातून मास मीडियाचे (Mass Media) शिक्षण घेत असून, माध्यम, डिझाईन व सर्जनशील अभिव्यक्ती या क्षेत्रातील आपली शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्ये याचा अभ्यास करत आहेत. राज्यभरातील हजारो स्पर्धकांमधून ओंकार यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वस्तरातून काैतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *