रत्नागिरी : महिलांनो गोळ्या खाताय तर ही बातमी वाचा, महिलेने ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्या आणि …..

banner 468x60

काही वर्षांपूर्वी डायबेटिस आणि उच्च रक्तदाब हे त्रास ठराविक वयानंतर होणारे आजार मानले जात. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार साठीनंतरच्या लोकांना होतात असं दिसून यायचं.

मात्र, गेल्या दोन ते तीन दशकात भारतासह जगभरात ही स्थिती वेगानं बदलली आहे. या तिन्ही आजारांची सुरुवात वयाच्या अगदी कमी टप्प्यापासून सुरू होताना दिसत आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात ब्लड प्रेशर असलेल्या महिलेने प्रेशरच्या गोळ्या घेऊन झोपली असतानाअचानक तिच्या छातीत दुखू लागल्याने तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. गौरी शामराव गोसावी (५५, रा. आठवडाबाजार, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २७) रात्री पावणेबाराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोसावी यांना ब्लड प्रेशरचा आजार होता.

गोळ्या घेऊन त्या झोपल्या असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *