रत्नागिरी : विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू, मदतनीस कामगारांकडे सेफ्टी गार्ड नाहीत

banner 468x60

शहरातील निवखोल येथे महावितरणच्या पोलवरील तुटलेली वायर जोडत असताना विजेचा जोराचा शॉक लागून तरुण कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना सोमवार 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वा. सुमारास घडली.कुंदन दिनेश शिंदे (21, रा. फणसवळे भावेवाडी, रत्नागिरी) असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुण कामगाराचे नाव आहे.

सोमवारी दुपारी तो निवखोल येथील महावितरणच्या पोलवरील तुटलेली वायर जोडत होता. पोलवर चढण्यापूर्वी तेथील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता.

परंतू पोलवरील तुटलेली वायर जोडत असताना तेथील जनरेटचा करंट बॅक आल्याने त्याचा जोरदार धक्का कुंदनला बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही बाब त्याच्या इतर सहकार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी कुंदनला तपासून मृत घोषित केले.

मदतनीस म्हणून कामाला असणार्‍या कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास 300च्या आसपास आहे. या कामगारांना ठेकेदाराकडून कोणतेही सेफ्टी गार्ड पुरवण्यात येत नाहीत.

तसेच महावितरणच्या पोलवर प्रशिक्षित लाईनमनने दुरुस्तीची कामे करण्याचा नियम असताना मदतीस कामगारांना तुटपुंज्या पगारावर पोलवर चढवून त्यांच्याकडून कामे करवून घेण्यात येत असल्याची चर्चा शासकिय रुग्णालयात या मदतनीस कामगारांकडून सुरु होती.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *