रत्नागिरी : पत्नीच्या डोक्यात पतीने फोडली बिअरची बाटली, प्रशांत गमरे विरोधात तक्रार

banner 468x60

रत्नागिरी शहरातील टीआरपी आणि शांतीनगर येथे पायवाटेवर विनाकरण शिवीगाळ करुन पत्नीच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन दुखापत करणाऱ्या पतीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90 banner 728x90

प्रशांत कृष्णा गमरे (वय ३९, रा. बुरंबाड, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे बिअरची बाटली मारणाऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी तीन च्या सुमारास शांतीनगर येथे पायवाटेवर घडली.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणार महिला या घरकाम करुन पायवाटेने जात असताना त्यांचे पती कृष्णा गमरे दारुच्या नशेत हातात एक पिशवित बिअरच्या बाटल्या घेऊन आला व त्यांना विनाकारण शिवीगाळ करुन हातातील पिशवितून बिअरची बाटली काढून त्यांच्या डोक्यावर मारुन दुखापत केली.

त्यानंतर पुन्हा दुसरी बाटली काढून मारत असताना अडविले. आरडा-ओरडा केला असता खबर देणार महिलेचा पती तेथून पसार झाला. या प्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *