रत्नागिरी : वैदही रानडे यांनी स्वीकारला जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

banner 468x60

रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैदही मनोज रानडे यांनी आज (१०) पदभार स्वीकारला. त्या एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.

रत्नागिरीचे सीईओ किर्ती किरण पुजार यांची बढतीने धाराशीव येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांची रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती.


६ मार्च रोजी त्यांच्या बदलीच्या ऑर्डर्स निघाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

वैदही रानडे यांनी यापूर्वी रत्नागिरीत निवडणूक उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी आणि कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे प्रांताधिकारी म्हणून कामगिरी बजावली आहे.

त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील त्यांना माहिती आहे. पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमध्येही त्यांनी नियोजनबध्द काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *