रत्नागिरी : ‘टीडब्ल्यूजे’च्या संचालकाच्या शोधात चार जिल्ह्यातील पोलीस

banner 468x60

‘टीडब्ल्यूजे’ संस्थेच्या संचालकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असली, तरी हा व्हिडीओ जुना असल्याचे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले. संस्थेचा संचालक समीर नार्वेकर याच्या शोधासाठी चार जिल्ह्यांतील पोलीस पथके कार्यरत असून, लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

banner 728x90

‘टीडब्ल्यूजे’ने चिपळूणमध्ये हायटेक कार्यालय उभारून दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना आकर्षित केले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना लाभ देण्यात आल्याने संस्थेची लोकप्रियता वाढली. मात्र नंतर परतावा मिळण्यास विलंब होऊ लागला आणि संचालक संपर्काबाहेर राहू लागल्याने फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले. यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या; काही दिवसांपूर्वी चिपळूण पोलिस ठाण्यात संतप्त गुंतवणूकदारांनी धडक देत आत्मदहनाचा इशाराही दिला होता.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओबाबत खातरजमा करण्यात आली असून तो जुना असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. संचालक अन्यत्र गेल्याचा संशय असून त्या दिशेने शोध सुरू आहे.

व्हिडीओमध्ये काय दावा?
व्हायरल व्हिडीओत संचालकाने ‘टीडब्ल्यूजे’मध्ये सुमारे ११ हजार गुंतवणूकदार असून, त्यापैकी राज्यातील शेकडो पोलीस असल्याचा दावा केला आहे. तसेच चिपळूण पोलिस ठाण्यातील अनेक कर्मचारी गुंतवणूकदार असल्याचेही त्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *