रत्नागिरी : ट्रक बाजूला घेण्यास सांगितले शोएबने दगड डोक्यात घातला

banner 468x60

रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे ट्रक बाजूला घ्या असे सांगितल्याच्या रागातून रिक्षा चालकाला शिवीगाळ करत दगड डोक्यात मारुन दुखापत केल्याची घटना सोमवार 16 जून रोजी दुपारी 3.45 वा.सुमारास घडली.

banner 728x90

शोएब आझाद मुकादम (35,रा.कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात फजल अब्दुल लतीफ गुहागरकर (39, रा. स्टेट बँक कॉलनी, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार, सोमवारी दुपारी फिर्यादी हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08-एक्यू-4590) घेऊन आपल्या पाटणकर रेसिडेन्सी येथील घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या इमारतीच्या प्रवेशव्दारासमोर संशयिताच्या दुकानातील सामान घेऊन आलेला ट्रक उभा होता.

त्यावेळी फिर्यादीने संशयिताला तुम्ही तुमचे सामान घेउन आलेला ट्रक बाजूला करा मला रिक्षा आत घेउन जाण्यास अडचण होत आहे,असे सांगितले. याचा राग आल्याने संशयिताने फिर्यादीला शिवीगाळ करत बाजुचा दगड उचलून तो फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्याला दुखापत केली.

याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *