जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नामनिर्देशनपत्र भरण्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. रत्नागिरी तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार ॲड. महेंद्र मांडवकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
या प्रसंगी शिवसैनिक आणि ॲड. मांडवकर यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते निलेश सांबरे, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह पावस पंचक्रोशीतील शिवसेना-भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरी निवडणूक अधिकारी कार्यालयातून २५ व्यक्तींनी एकूण ५२ उमेदवारी अर्ज स्वीकारले. दोन दिवसांत ३९ व्यक्तींनी ८२ उमेदवारी अर्ज स्वीकारले असून त्यात शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप व अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
यावेळी विभागप्रमुख विजय चव्हाण, उपविभागप्रमुख प्रवीण शिंदे, ज्ञानदेव कोकरे, स्वाती शिंदे, सरपंच सामंत, युवासेनेचे नंदू भाटकर, मेर्वीचे सरपंच शशिकांत म्हादे, उपविभाग संघटक जितेंद्र शिर्सेकर, बंटी महाकाळ, जिजाऊ संघटनेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष मंदार नैकर, लांजा तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ यांच्यासह शिवसेना, भाजप व जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













