रत्नागिरी : शर्मिन चौगुले हिने इटलीमधून मिळवली Law मध्ये PhD पदवी

banner 468x60

रत्नागिरीची कन्या शर्मिन निसार चौगुले हिने Law मध्ये PhD पदवी संपादन केली असून तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. इटलीमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी तिला “Civil Law and Constitutional Legality” ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. शर्मिनचे बालपण व मूळगाव जयगड, रत्नागिरी.

banner 728x90

दहावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरी येथील सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षण गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाले. बारावीनंतर ती उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेली आणि मुंबई सायन येथून शिक्षण पूर्ण केले. B. Com झाल्यानंतर तिने Company Secretary (C.S.) ही प्रतिष्ठित पदवी मिळवली. त्याचबरोबर LLB आणि LLM ही पदवीही तिने मेहनतीने पूर्ण केली.


पुण्यात नोकरी करत असताना पुढील उच्च शिक्षण परदेशात घेण्याचा निर्णय तिने केला. कोणतीही मदत किंवा आधार न घेता फक्त स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर तिने ही वाटचाल केली व इटलीमध्ये PhD साठी प्रवेश मिळवला. शिक्षणासोबत ती नोकरीही करत होती आणि आईला आर्थिक मदतही नियमित पाठवत होती. एप्रिल 2020 मध्ये वडिलांचे निधन होऊनही तिने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत कठोर परिश्रम सुरू ठेवले.


एकुलती एक मुलगी असूनही शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी यांचा तोल राखत तिने ही डॉक्टरेट पदवी मिळवून दाखवली. तिच्या कुटुंबियांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत, शर्मिनने चौगुले कुटुंबाचे नाव उंचावले. आमच्यासाठी ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. शर्मिन चौगुलेचे यश संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *