रत्नागिरी : दुःखद महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूती दरम्यान मृत्यू

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात दुःखद घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील पोलीस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 25 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली.

banner 728x90


सांची सुदेश सावंत (38, रा. हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिला पोलिसांचं नाव आहे. त्या नउ महिन्यांची गरोदर होत्या . गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी तिला अचानकपणे आकडी आल्याने ती बेशुध्द पडली. तिला अधिक उपचारांसाठी दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याठिकाणी उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी 3.18 वा. सुमारास तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सांची सावंत हिचे पतीही पोलिस विभागातील श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत असून या दाम्पत्याला दोन मुली आहेत.

सांची ही तिसऱ्यावेळी गरोदर असताना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. परंतू शुक्रवारी सकाळी तिला आकडी येउन ती बेशुध्द पडली. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला शहरातीलच दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्यावर सांचीच्या पतीने तिला तातडीने दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

त्याठिकाणी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दुर्दैवाने तिचे मुलही दगावले असून सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी 4.30 वा. सुमारास उत्तरीय तपासणीसाठी सांचीचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात नेण्यात आला.


दरम्यान सांचीचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच पोलिस अधिक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे, श्वान पथकातील पोलिस कर्मचारी तसेच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झाले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *