रत्नागिरी : ‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’ मध्ये प्रथमेश पवार यांचा डंका; तिहेरी सन्मान

banner 468x60

‘काय समाजलीव’ प्रस्तुत ‘रत्नागिरी रील स्पर्धा 2025’ मध्ये प्रथमेश पवार यांनी उत्कृष्ट अभिनय, छायांकन आणि एकूण कलात्मकतेसाठी तीन प्रमुख पुरस्कार पटकावत स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

banner 728x90

त्यांना द्वितीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्कृष्ट छायांकन या विभागांमध्ये सन्मानित करण्यात आले.


या गौरवप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रथमेश पवार यांचा सन्मान करण्यात आला, ही बाब रत्नागिरीतील नवोदित कलाकारांसाठी मोठा प्रेरणास्त्रोत ठरली आहे.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ३ ऑगस्ट रोजी रत्नागिरीतील अंबर हॉल, टी.आर.पी. येथे पार पडला. कार्यक्रमाला रत्नागिरीतील अनेक डिजिटल क्रिएटर्स, रसिक प्रेक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.


स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण १३० रील्स सहभागी झाल्या होत्या. त्यात प्रथमेश पवार यांच्या टीमने सादर केलेल्या प्रभावशाली कथानक, अभिनय आणि तांत्रिक सफाईमुळे त्यांची रील स्पर्धेच्या निर्णायकांकडून विशेष कौतुकास पात्र ठरली.

‘रत्नागिरी रील स्पर्धा’मध्ये प्रथमेश पवार यांचा तिहेरी सन्मान होत मोठी दखल घेतली गेली. त्यांनी आपल्या रीलसाठी द्वितीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, तसेच सर्वोत्कृष्ट छायांकन या तीन प्रमुख विभागांमध्ये पुरस्कार पटकावत जिल्ह्यात आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे.


याबाबत प्रतिक्रिया देताना प्रथमेश पवार म्हणाले, “या स्पर्धेत आमच्या रीलला द्वितीय क्रमांक मिळाला ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. हे यश माझ्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे फळ आहे. अनेक अडथळ्यांवर मात करत आम्ही ही कलाकृती पूर्ण केली. ‘काय समाजलीव’चे आणि रत्नागिरीकर प्रेक्षकांचे मनापासून आभार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *