ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांपैकी आदित्य मोरे या तरुणाबद्दल अत्यंत हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. आदित्य मोरे याने अपघातापूर्वीच ३ नोव्हेंबर रोजी असलेली आपली सेकंड शिफ्ट बदलून फर्स्ट शिफ्ट मागून घेतली होती. दुर्दैवाने हेच आदित्यच्या जीवावर बेतलं.
केवळ तीनच महिन्यांपूर्वी नोकरीला लागलेल्या आदित्य मोरेचं एमएससी होण्याचं स्वप्न देखील या दुर्घटनेमुळे अपूर्ण राहिलं आहे. ब्लू जेट हेल्थकेअर या कारखान्यांमध्ये शुक्रवारी ३ नोव्हेंबरला भीषण स्फोट होऊन सात कामगार गंभीर जखमी झाले. तर बेपत्ता असलेल्या अकरा कामगारांपैकी सात कामगारांचे मृतदेह सापडले आहेत.
उर्वरित दगावलेल्या कामगारांची शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे. सापडलेले मृतदेह अक्षरश: जळून खाक झाल्याने त्यांची ओळख पटवणे खूपच अवघड झाले आहे. या मोठ्या दुर्घटनेत तब्बल अकरा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात दगावलेल्या मृतांच्या आता केवळ आठवणीच उरल्या आहेत.
महाड शहराजवळ असणाऱ्या चोचींदे गावातील आदित्य मोरे हा तरुण नुकताच बीएससी पास झाला. आदित्यचे वडील एका औषध दुकानात कामाला आहेत. मुलाला त्यांनी शिकवून मोठे केले.
केवळ तीनच महिन्यांपूर्वी आदित्य ब्लू जेट कंपनीमध्ये कामाला लागला होता. एकीकडे आपले काम सांभाळत असताना त्याला एमएससी होण्याची मोठी इच्छा होती.
त्यामुळे त्याने आपल्या काही मित्रांसोबत एमएससीला ऍडमिशन घेतले होते. तीन नोव्हेंबरला आदित्यची सेकंड शिफ्ट होती. परंतु काही कारणास्तव त्याने ही शिफ्ट बदलून फर्स्ट शिफ्ट घेतली. आणि कामावर असताना ब्ल्यू जेट कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. यात दगावलेल्या कामगारांमध्ये आदित्यचा देखील समावेश आहे. आपल्या गावातील तरुण मुलाच्या या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*