रत्नागिरी पोलिसांचा सामाजिक पुढाकार मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक दिवसाचे वेतन दिलं

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी पोलीस दलाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीसाठी दान केले आहे. या योगदानाचा धनादेश जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द केला.

banner 728x90

मंडणगड येथील न्यायालयीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा औदार्याचा क्षण पार पडला. माननीय सरन्यायाधीश भूषण गवई , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासारख्या उच्च पदस्थ मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी माहिती देताना सांगितले की, या महत्त्वाच्या समारंभाच्या निमित्ताने अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत रत्नागिरी पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय शांततेत आणि सुरळीत बंदोबस्त पार पाडला. बंदोबस्त थकवणारा असला तरी पोलिसांनी आपले कर्तव्य समर्थपणे बजावले. कर्तव्यासोबतच, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांनी हा विधायक निर्णय घेतला आणि आपल्या एक दिवसाच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री मदत निधीसाठी मुख्यमंत्री महोदयांना भेट दिला.
पोलीस दलाच्या या योगदानामुळे त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वाबरोबरच सामाजिक जाणीवेचेही कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *