रत्नागिरी : लोकं का देत आहेत पैसे, 90 हजाराची महिलेची ऑनलाईन फसवणूक, ऑनलाइन कोणतेही व्यवहार करु नका कोकण कट्टा न्यूजचं आवाहन

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात अलीकडेच ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. ज्या महिला 10 रुपयाची कोथींबीर 5 रुपयात घेण्यासाठी आपली 10 मिनिटं घालवतात त्यावेळी एवढी मोठी रक्कम अश्या लोकांना का देतात हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडावा असा आहे.

कारण सर्वात जास्त फसवणुकीचे व्यवहार हे महिलांसोबत झाल्याचं समोर आलं आहे.

कोकण कट्टा न्यूजने याआधी आणि आत्ता ही आवाहन करत आहे की ऑनलाइन कोणतेही व्यवहार करु नका अश्यावेळी 100 वेळा विचार करा, माहित नसलेले कोणतेही कॉल उचलू नका आणि आपली कोणतीही माहिती समोरच्याला देऊ नका अश्या कोणत्याही गोष्टीबद्दल संशय असेल तर आपण कोकण कट्टा न्यूजला संपर्क करु शकता.


रत्नागिरीत 90 हजाराची महिलेची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. सोशल मिडीयाच्या बीटकॉईन जास्त पैसे कमविण्याचे अमिष दाखवून फिर्यादी महिलेच्या बॅंक

खात्यातून ९० हजार १९५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ ऑगस्ट २०२४ ला सकाळी साडेनऊ ते दुपारी चार या वेळात श्रीरंगाई अपार्टमेंट धन्वंतरी हॉस्पीटल शिवाजीनगर, रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेने त्यांचा सोशल मिडियाच्या साईटवर तुम्ही घरी बसून बीट कॉईन मध्ये पैसे गुंतवून पैसे कमवू शकता अशी जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीवर लिंक केले असता.

अज्ञाताने फिर्यादीशी संपर्क करुन बिट कॉईनमध्ये गुंतवणूक करुन जास्त पैसे कमविण्याचे अमिष दाखवून त्यांच्या खात्यातून ९० हजार १९५ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.

या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *