जगन्नाथ पुरी (ओडिसा) येथे सुरू असलेल्या ५७ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाकडून निवड झालेल्या महिला संघात रत्नागिरीच्या पायल पवारची निवड झाली आहे.
अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय निवडचाचणी खो-खो स्पर्धेतून पुरुष व महिला गटाचे संघ निवडण्यात आले होते. सांगली येथे सराव शिबिर झाल्यानंतर हे दोन्ही संघ नुकतेच जगन्नाथ पुरीकडे रवाना झालेले आहेत.
या संघांना महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खो-खो फेडरेशन आॅफ इंडियाचे सहसचिव तथा राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांच्यासह राज्य असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
दोन्ही राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करतील अशी आशा सचिव डॉ. जाधव यांनी व्यक्त केली आहे. पायल पवार हिने आतापर्यंत विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. तिला राष्ट्रीय मार्गदर्शक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन मिळत असून तिच्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे माजी सचिव संदिप तावडे, विनोद मयेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे अभिनंदन आले.
पुरुष संघ ः लक्ष्मण गवस (कर्णधार, ठाणे), प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, रूद्र थोपटे, रविकिरण कच्छवा, शुभम थोरात (सर्व पुणे), ऋषिकेश मुर्चावडे, अनिकेत चेदवणकर, निहार दुबळे (मुंबई उपनगर), विजय शिंदे, श्याम ढोबळे (धाराशिव), मिलिंद चावरेकर, अक्षय मासाळ (सांगली), पियुष घोलम (मुंबई), नरेंद्र कातकडे (अहिल्यानगर). प्रशिक्षक ः नरेंद्र कुंदर, सहाय्यक प्रशिक्षक पवन पाटील, व्यवस्थापक रमेश लव्हाट.
महिला संघ ः अश्विनी शिंदे (कर्णधार), संपदा मोरे, प्रीती काळे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले (धाराशिव), सानिका चाफे, रितिका मगदूम, प्रगती कर्नाळे (सांगली), प्रियांका इंगळे, दिपाली राठोड, ऋतिका राठोड (पुणे), पायल पवार (रत्नागिरी), मनिषा पडेल (नाशिक), रेश्मा राठोड (ठाणे). प्रशिक्षक ः नरेंद्र मेंगळ, सहाय्यक प्रशिक्षक , व्यवस्थापक रमेश लव्हाट.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*