रत्नागिरी : ओणी येथील महिलेची गळफास घेत आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरु असलेल्या महिलेने रहात्याघरी लोखंडी पाईपला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्या विलास फणसोपकर (वय ५१, रा. ओणी, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) पहाटे ३ ते ४ च्या सुमारास ओणी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्या फणसोपकर या २०१४ पासून मानसिक रुग्ण होत्या. त्यांच्यावर रत्नागिरीतील प्रादेशिक रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी त्यांना लोखंडी पाईपला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *