रत्नागिरी : नितीन बगाटे रत्नागिरीचे नवे पोलिस अधीक्षक

banner 468x60

रत्नागिरी: रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. रत्नागिरी येथे बदली होण्यापूर्वी ते पोलिस उप आयुक्त म्हणून छत्रपती संभाजी नगर शहर येथे कार्यरत होते.

banner 728x90


नितीन बगाटे हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले होते. आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे ते पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यानंतर ते आयपीएस अधिकारी बनले. परभणी येथे २०१८ ते २०२० याकाळात ते प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते.

नितीन बगाटे यांची दबंग अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यांनी परभणी, चंद्रपूर, सिंधुदुर्ग येथे काम केले आहे.
परभणीत विधानसभा निवडणूक दरम्यान त्यांची तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी बाचाबाची झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परभणीतील सभेत डी झोनमध्ये शिरलेल्या कार्यकर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केल्यावरुन बगाटे आणि धनंजय मुंडे यांच्यात हा वाद झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळूचे टिप्पर पकडल्यावरुन त्यांचा खासदार संजय जाधव यांच्याशीही वाद झाला होता.


रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बगाटे यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांमध्ये उत्साह आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग अवैध गतिविधींवर नियंत्रण ठेवण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे.

रत्नागिरीतील अंमली पदार्थांचा व्यापार नष्ट करण्याचे मोठे आव्हान बगाटे यांच्यासमोर असणार आहे. बगाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *