रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, बावनदी येथे डंपर पलटी, चालक जखमी

banner 468x60

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी (ता. रत्नागिरी) येथील धोकादायक उतारावर आज पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास डंपरचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असून चालक किरकोळ जखमी झाला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, MH-43 Y 5998 क्रमांकाचा डंपर जयगड येथून मुंबईकडे कोळसा घेऊन जात होता. बावनदी येथील वळणदार उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या उतारावर जाऊन पलटी झाला.

या अपघातात अलगुराय (वय ४०, रा. पाटणा, बिहार) हे जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मोफत रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अपघातानंतरही महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी हातखंबा पोलीस मदत केंद्र व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांचे अधिकारी तात्काळ दाखल झाले होते.

या प्रकरणी पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *