रत्नागिरी : मंगलोर एक्स्प्रेसमध्ये महिलेची स्लिंगबॅग पळवली, दीड लाखाचे नुकसान

banner 468x60

कोकण रेल्वेच्या मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची स्लिंगबॅग चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल असा १ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. लांजा पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०२४ ला सकाळी साडेचारच्या सुमारास वेरवली रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.

banner 728x90 banner 728x90

फिर्यादी महिला व तिचे पती आणि दोन मुले मुंबई ठाणे ते उडपी (कर्नाटक राज्य) असे मंगलोर एक्स्प्रेसने प्रवास करत होते. कोकण रेल्वेच्या वेरवली रेल्वेस्टेशन येथे गाडी क्रॉसिंगसाठी थांबलेली असताना चोरट्याने फिर्यादी महिला, पती व मुले झोपली होती.

या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या सीटजवळ असलेली स्लिंगबॅग चोरट्याने पळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *