रत्नागिरी : कौटुंबिक कलहातून पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या

banner 468x60

रत्नागिरी शहरातील कुवारबाव येथील लक्ष्मीकेशवनगरमध्ये एका धक्कादायक घटनेत पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीला अपत्य होत नसल्याने सुरू असलेल्या उपचारांमुळे आणि त्यातून उद्भवलेल्या घरगुती वादामुळे पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ही घटना ८ जून २०२५ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास फ्लॅट नं. १०४ मध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद विलास सावंत (वय ३८) या व्यक्तीने आपल्या राहत्या घरी बेडरुममधील पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेऊन जीवन संपवले. विवेकानंद यांची पत्नीला अपत्यप्राप्तीसाठी उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिला कोणतेही काम न करण्याचा आणि ताण न घेण्याचा सल्ला दिला होता. यामुळे तिची काळजी घेण्यासाठी खबर देणाऱ्या व्यक्ती रत्नागिरीत आल्या होत्या.
मात्र, पत्नी कोणतेही काम करत नसल्याने विवेकानंद आणि त्यांच्या पत्नीमध्ये अधूनमधून वाद होत होते. ८ जून २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादामुळे विवेकानंद यांनी खबर देणाऱ्या व्यक्तीला आणि पत्नीला घराबाहेर काढून दरवाजा बंद करून घेतला.
घराबाहेर काढल्यानंतर खबर देणाऱ्या व्यक्तीने तात्काळ ११२ या पोलीस हेल्पलाइनवर कॉल करून पोलिसांना बोलावले. पोलीस आणि सोसायटीमधील लोकांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. घरात प्रवेश केल्यावर त्यांना विवेकानंद हे बेडरुमधील पंख्याला दुपट्टा गुंडाळून गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांची कोणतीही हालचाल होत नसल्याची खात्री झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती ९ जून २०२५ रोजी पहाटे ३ वाजून ४१ मिनिटांनी पोलिसांना देण्यात आली. रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी आमृ. क्रमांक ५५/२०२५ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *