कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाजवळ रत्नागिरीहून येणारी कार आणि कोल्हापूरहून केर्ली गावाच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये प्रकाश चौधरी (वय 32) आणि अमित शिंदे (वय 30) रा. नरवाडी (ता. मिरज) हे मोटरसायकल वरील दोघेजण गंभीर जखमी झाले.
ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता केर्ली (ता.करवीर) येथील थाळी कट्टा हॉटेलच्या समोर घडली. टेंभे हातीस (रत्नागिरी) येथील रोहित बाळकृष्ण साळवी हे त्यांची बहीण ऋतुजा हिला कोल्हापुरातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी कोल्हापूरच्या दिशेने जात होते.
केर्ली (ता. करवीर) येथे त्यांची टियागो कार व कोल्हापूरहून केर्लीच्या दिशेने येणारी डबल सीट होंडा मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये मोटरसायकल वरील दोघांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
त्यांना 108 ॲम्बुलन्समधून सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी करवीर पोलीस उशिरापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. दरम्यान, घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.
वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*