रत्नागिरी : कोकणकन्या डॉ. सुरभी अभ्यंकरच्या रिसर्चला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता

banner 468x60

एका जिद्दी आणि हुशार असलेल्या कोकणकन्येने भारतात डिग्री घेतल्यानंतर अमेरिकेत जाऊन पुढील शिक्षण घेतलं. ती एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने मेडिकल सायन्समध्ये केलेलं संशोधन ही नवी औषध उपचार पद्धती शोधण्यासाठी दिशादर्शक ठरलं आहे.

सुरभी अभ्यंकर या कोकणकन्यने वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात केलेलं संशोधन महत्त्वाचं ठरलं आहे. मधुमेह, अल्झायमर आणि मेंदूतील विकार यावर गुंतागुंतीच्या आजाराबाबत दृष्टीपटलाद्वारे या गंभीर आजारांचं निदान यावर यशस्वी संशोधन केलं आहे. या संशोधनाला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून याबाबतचा डॉ. सुरभीचा संशोधन रिसर्च पेपरही पब्लिश झाला आहे.

banner 728x90

कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावची सुकन्या डॉ. सुरभि दीपक अभ्यंकर हिने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधून जैव रसायनशास्त्र व आण्विक जीवशास्त्र (Biochemistry & Molecular Biology) या विषयात संशोधन केल्याने तिला नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी (http://B.Sc.) आणि बायोफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी (http://M.Sc.) प्राप्त केली.

याच काळात तिला संशोधनाची आवड निर्माण झाली आणि तिने पीएचडीसाठी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अर्ज केला. तिच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीमुळे तिला अमेरिकेतील पाच विद्यापीठांमधून शिष्यवृत्तीसह प्रवेशासाठी तिची निवड झाली होती. तिने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीची निवड केली. डॉ. सुरभी अभ्यंकरने आपल्या वडिलांचा मधुमेह आजार पाहिला होता. त्याचे दुष्परिणामही पाहिले होते.

इतकंच नाही तर याच आजाराने वडिलांचा झालेला मृत्यू पहिला होता. त्यामुळे तिने याच आजारावर संशोधन करण्याची जिद्द बाळगली होती. तिच्या या वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील संशोधनाला तिची आई दीप्ती अभ्यंकर यांनीही तिला मोठ पाठबळ दिला. त्यामुळेच तिने संशोधनातून मिळवलेलं यश वडिलांना समर्पित केलं आहे. भविष्यात नवीन औषधनिर्मितीला दिशा देण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. त्यामुळे या कोकणकन्येने केलेलं संशोधन हे वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

एक नवीन औषध उपचार पद्धती, थेरपी या संशोधनामुळे विकसित होईल असा विश्वास सुरभीने व्यक्त केला. दृष्टिपटलामध्ये होणाऱ्या बदलावरुन आजाराचं निदान, संशोधन हे दृष्टिपटल आणि अल्झायमर यांच्यातील जैविक संबंधांवर आधारित आहे. दृष्टिपटल हा मेंदूचाच एक भाग आहे. त्यामुळे जर मेंदूमध्ये काही विकृती होऊ लागल्या असतील, तर त्याचे सुरुवातीचे संकेत डोळ्यांतून मिळू शकतात. अल्झायमर हा स्मृती, विचारशक्ती आणि वर्तनावर परिणाम करणारा मेंदूचा आजार आहे, जो वय वाढल्यावर सामान्यतः दिसून येतो.

लवकर निदान झालं, तर औषधोपचार अधिक प्रभावी ठरू शकतात त्यामुळे हे संशोधन मोठं ठरलं आहे. माउस मॉडेल्स, सेल कल्चर आणि नवीन औषधांसाठी दिशा ठरवताना तिच्या संशोधनासाठी अल्झायमरच्या जोखमीशी संबंधित APOE4 जनुक असलेल्या उंदरांचा (mouse model) वापर केला आणि पेशींवर आधारित प्रयोगाद्वारे विविध जैविक बदलांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये तिने दृष्टिपटलामध्ये होणाऱ्या सुरुवातीच्या बदलांचा मागोवा घेतला आणि हे बदल मधुमेह किंवा चयापचन बिघाड असलेल्या

स्थितीत अधिक तीव्र असल्याचं निरीक्षण नोंदवलं. विशेष बाब म्हणजे, डॉ. सुरभीने एका औषधाची चाचणी केली असून, हे औषध अल्झायमरमध्ये होणाऱ्या दृष्टिपटलाच्या नुकसानावर प्रभावी ठरू शकतं. भविष्यात त्यांच्या संशोधनचा उपयोग अल्झायमरच्या उपचारातही होऊ शकतो आणि ही संशोधन दिशा देऊ शकते.
कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावची सुकन्या डॉ. सुरभि दीपक अभ्यंकर हिने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी

स्कूल ऑफ मेडिसिनमधून जैव रसायनशास्त्र व आण्विक जीवशास्त्र (Biochemistry & Molecular Biology) या विषयात संशोधन केल्याने तिला नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी (http://B.Sc.) आणि बायोफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी (http://M.Sc.) प्राप्त केली. याच काळात तिला संशोधनाची आवड निर्माण झाली आणि तिने पीएचडीसाठी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अर्ज केला. तिच्या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीमुळे तिला अमेरिकेतील पाच विद्यापीठांमधून शिष्यवृत्तीसह प्रवेशासाठी तिची निवड झाली होती. तिने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीची निवड केली. डॉ. सुरभी अभ्यंकरने आपल्या वडिलांचा मधुमेह आजार पाहिला होता. त्याचे दुष्परिणामही पाहिले होते. इतकंच नाही तर याच आजाराने वडिलांचा झालेला मृत्यू पहिला होता. त्यामुळे तिने याच आजारावर संशोधन करण्याची जिद्द बाळगली होती. तिच्या या वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील संशोधनाला तिची आई दीप्ती अभ्यंकर यांनीही तिला मोठ पाठबळ दिला.

त्यामुळेच तिने संशोधनातून मिळवलेलं यश वडिलांना समर्पित केलं आहे. भविष्यात नवीन औषधनिर्मितीला दिशा देण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. त्यामुळे या कोकणकन्येने केलेलं संशोधन हे वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. एक नवीन औषध उपचार पद्धती, थेरपी या संशोधनामुळे विकसित होईल असा विश्वास सुरभीने व्यक्त केला. दृष्टिपटलामध्ये होणाऱ्या बदलावरुन आजाराचं निदान, संशोधन हे दृष्टिपटल आणि अल्झायमर यांच्यातील जैविक संबंधांवर आधारित आहे. दृष्टिपटल हा मेंदूचाच एक भाग आहे. त्यामुळे जर मेंदूमध्ये काही विकृती होऊ लागल्या असतील, तर त्याचे सुरुवातीचे संकेत डोळ्यांतून मिळू शकतात. अल्झायमर हा स्मृती, विचारशक्ती आणि वर्तनावर परिणाम करणारा मेंदूचा आजार आहे, जो वय वाढल्यावर सामान्यतः दिसून येतो. लवकर निदान झालं, तर औषधोपचार अधिक प्रभावी ठरू शकतात त्यामुळे हे संशोधन मोठं ठरलं आहे.

माउस मॉडेल्स, सेल कल्चर आणि नवीन औषधांसाठी दिशा ठरवताना तिच्या संशोधनासाठी अल्झायमरच्या जोखमीशी संबंधित APOE4 जनुक असलेल्या उंदरांचा (mouse model) वापर केला आणि पेशींवर आधारित प्रयोगाद्वारे विविध जैविक बदलांचा अभ्यास केला. या अभ्यासामध्ये तिने दृष्टिपटलामध्ये होणाऱ्या सुरुवातीच्या

बदलांचा मागोवा घेतला आणि हे बदल मधुमेह किंवा चयापचन बिघाड असलेल्या स्थितीत अधिक तीव्र असल्याचं निरीक्षण नोंदवलं. विशेष बाब म्हणजे, डॉ. सुरभीने एका औषधाची चाचणी केली असून, हे औषध अल्झायमरमध्ये होणाऱ्या दृष्टिपटलाच्या नुकसानावर प्रभावी ठरू शकतं. भविष्यात त्यांच्या संशोधनचा उपयोग अल्झायमरच्या उपचारातही होऊ शकतो आणि ही संशोधन दिशा देऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *