रत्नागिरी : खासगी बस किंवा रिक्षा जास्त भाडे आकारात असेल तर तक्रार करा आणि दर फलक पाहा, ‘आरटीओ’कडून दर प्रसिद्ध

banner 468x60

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत एक तक्ता प्रसिद्ध करण्यात आला आहे. उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणीचे अनेक प्रकार घडतात. रिक्षाचालक किंवा बस वाहतूकदारांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तनाचे प्रकारही घडतात.

banner 728x90

आता प्रवाशांना त्याबद्दलची थेट तक्रार व्हॉट्सअ‍ॅपवर करता येणार आहे. या संदर्भातील तक्रार नागरिकांनी 8275101779 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर वाहन आणि प्रवासाच्या तपशिलासह करावी, असे आवाहन रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. खासगी बसने किती जास्तीत जास्त किती भाडे आकारावे आणि मीटरप्रमाणे व शेअर रिक्षाचे दर किती असावेत याबाबतचे दरतक्ते आरटीओ कार्यालयाने प्रसिद्ध केले आहेत. त्याचे

पालन न करणाऱ्यांविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जादा भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बस आणि रिक्षा यांच्याविरुद्ध तक्रार करताना वाहन क्रमांक आणि प्रवासाचा तपशीलही पाठवावा. dyrto.08-mh@gov.in हा ई-मेल आयडी अथवा 8275101779 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेला भाडेदर तक्ता (मीटरप्रमाणे आणि शेअर रिक्षा) जिल्ह्यातील विविध रिक्षाथांब्यांवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यःस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे भाडे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाहीत. कमाल भाडेदर २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत. ते आरटीओ कार्यालयाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रसिद्ध केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *