रत्नागिरी : कर्ला गावचे पोलीस पाटील उदय लिमये यांनी केली आत्महत्या

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील कर्ला गावचे पोलिस पाटील उदय मधुसुदन लिमये यांनी आज बुधवार दुपारी ११.४५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. सकाळी त्यांनी पूजेसाठी फुले काढून नेली व पूजा केली. तसेच पोळी-भाजी ही खाल्ली.

Ratnagiri Kokan katta news

banner 728x90

त्यानंतर पत्नी व मुलगी नोकरीनिमित्त घराबाहेर गेले. घरात कोणी नसताना त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. नोकरीस गेलेल्या पत्नीने दुपारचे जेवण करण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांनी कॉल उचलला नाही म्हणून त्या बघण्यासाठी घरी आल्या. तेव्हा दरवाजा उघडा होता. उदय लिमये हे हळव्या मनाचे होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उदय लिमये हे कर्ला-लिमयेवाडी प्रभागात पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ते एक प्रसिद्ध वादक म्हणूनही पंचक्रोशीत परिचित होते. बुधवारी सकाळी त्यांची पत्नी अंगणवाडीत कामाला गेली असताना, घरात कोणीही नव्हते.

याच संधीचा फायदा घेऊन उदय लिमये यांनी घराच्या छताच्या हुकाला दोरीने गळफास घेतला. दुपारी पत्नी घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ घरातील इतर सदस्यांना याची माहिती दिली.

त्यानंतर त्यांच्या भावाने तातडीने उदय लिमये यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. उदय लिमये यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कर्ला-लिमयेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *