रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलांची तब्बल 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े.
हानिफा साजिद मिरकर (35, ऱा राजीवडा रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पोलिसांत तकार दाखल केल़ी यामध्ये एकूण 31 महिलांची फसवणूक झाली असल्याचे मिरकर यांनी तक्ररीत नमूद केले आह़े पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा आहे.
फरहत इम्रान वस्ता आणि इम्रान यासीन वस्ता (ऱा राजीवडा रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहत व इम्रान वस्ता यांनी राजीवडा येथे तक्रारदार यांच्यासह महिलांचे गट तयार केल़े तसेच या महिलांना वेगवेगळ्या फायनान्स कंपनीत नेवून त्यांच्या नावे कर्ज काढून दिले होत़े.
दरम्यान संशयितांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी व पुणे येथे कोर्टात सुरू असलेल्या केससाठी पैशाची गरज असल्याचे या महिलांना सांगितल़े तसेच या महिलांना जेवढे पैसे घेतले, त्यापैक्षा जास्तीचे पैसे देण्याचे आमिष संशयितांनी दाखवले, असा आरोप ठेवण्यात आला आह़े.
संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विविध गटातील 31 महिलांनी जानेवारी 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत सुमारे 29 लाख रुपये त्यांना दिल़े पैसे स्वीकारुन संशयित हे आपले पैसे परत करत नसल्याने आपली फसवणूक करण्यात आल्याचे या महिलांच्या लक्षात आल़े
त्यानुसार या महिलांपैकी हानिफा मिरकर यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केल़ी पोलिसांनी या पकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल केला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















