चिपळूण शहरात २६ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. छोटा नातू रडत होता म्हणून आजोबानी वाकून पाहिले आणि पायाखालची जमीनच सरकली.
आपल्या दीड वर्षांच्या मुलासमोर आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवारी चिपळूणमधील पाग परिसरात घडली. कोमल सचिन दिलवाले (२६) असे मृत महिलेचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाग येथील एका अपार्टमेंटमध्ये कोमल नवरा, दीड वर्षांचा मुलगा, सासू-सासरे यांच्या समवेत रहात होती. गुरुवारी सकाळी ती आणि मुलगा हे दोघेच घरी होते. तर इतर कामानिमित्त बाहेर गेले होते.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोमलचे सासरे घरी परतले. त्यावेळी त्यांना नातवाच्या रडण्याचा आवाज आला. कोमलला हाक मारूनही ती प्रतिसाद देत नव्हती. तर नातू जोरजोरात रडत असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले आणि समोरील दृश्य पाहून ते हादरले.
कोमलने गळफास घेतला होता तर तिला त्या अवस्थेत पाहून लहानगा नातू रडत होता. त्यांनी तातडीने मुलाला फोन करून बोलावून घेतले. यानंतर कोमलला शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित करण्यात आले.
कोमलने उच्च शिक्षण घेतले होते. तिच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













